उच्च रक्तदाबाची (हाय बी.पी.) काही कारणे हि आळस, असमतोल आहार,वाढते वय आणि  अनुवंशिकता हे असू शकतात . उच्च रक्तदाबाची काही स्पष्ठ लक्षणे नसतात त्यामुळे सहसा तुम्हाला ते जाणवत नाही. जर तुमचा रक्तदाब अतिउच्च असेल तर विलक्षण डोके दुखी , छातीमध्ये दुखणे , श्वास घेताना त्रास होणे, व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे अशी काही लक्षणे दिसून अली तर तुम्ही तातडीने चेकअप साठी जाणे गरजेचे आहे.

उच्च रक्तदाबाच्या (हाय बी.पी.)  उपचारासाठी सहसा जीवनशैली (लाईफ स्टाईल) बदल आणि गरज असेल तर औषधोपचार दिले जातात.

जीवनशैली (लाईफ स्टाईल)  बदला मध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.

  • वजन कमी करणे.
  • धूम्रपान बंद करणे .
  • समतोल आहार घेणे – ज्यामध्ये मोट्या प्रमाणामध्ये फळे, भाजीपाला, चरबी नसलेले मांस, सर्व प्रकारची धान्ये , मीठ आणि चरबी कमी असलेले जेवण या गोष्टींचा समावेश होतो.
  • आपल्या आहारतील मिठाचे प्रमाण कमी करा.
  • नियमित मृदू व्यायाम (एरोबिक्स) (जसे की चपळ चालणे )
  • मद्य (दारू) सेवनाला मर्यादा घाला.
  • झोपताना (श्वसनक्रियाला त्रास होणे / बंद होणे) यासाठी डॉक्टरनाकडून उपचार / सल्ला घ्या.

उच्च रक्तदाब  (हाय बी.पी.)  कमी करण्यासाठी आहार:

  • उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी अधिक प्रमाणात फळे, भाजीपाला, आणि कमी चरबीयुक्त व दुग्धयुक्त पदार्थ खाणे.
  • चरबी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण उच्च आहेत असे पदार्थ, कमी खाने जसे कि तळलेले पदार्थ.
  • अधिक प्रमाणामध्ये संपूर्ण धान्य उत्पादने, मासे, कोंबडी, आणि काजू (ड्राय फ्रुट्स ) खाणे.
  • कमी प्रमाणामध्ये चरबीयुक्त मांस आणि गोड पदार्थ कमी खाणे.
  • मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम युक्त पदार्थ खाणे.
  • सोडियम कमी असलेले पदार्थ खाणे.